शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
3
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
4
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
5
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
6
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
7
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
8
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
9
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
10
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
11
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
12
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
13
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
14
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
15
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
16
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
17
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
18
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
19
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींची कामे मंजूर पाणीटंचाई निवारण: सहा लाखांच्या अंदाजपत्रकांना मान्यता

By admin | Published: May 20, 2014 9:23 PM

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपयांच्या अंदाजपत्रकांनाही मान्यता देण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपयांच्या अंदाजपत्रकांनाही मान्यता देण्यात आली आहे.तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याला जिल्हाधिकार्‍यांमार्फत दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. कृती आराखड्यात जिल्ह्यातील १५८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या १२५ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या उपाययोजनांच्या कामांसाठी २ कोटी ८६ लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करून प्रशासकीय मंजुरी घेण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरूआहे. त्यामध्ये जिल्ह्यातील आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या विंधन विहिरींच्या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकांनाही जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. प्रशासकीय मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला. प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने संबंधित पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये लवकरच पाणीटंचाई निवारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत.