शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

हद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:37 PM

खुद्द मनपा प्रशासनाकडूनच कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरून घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

अकोला: महापालिकेत सामील करण्यात आलेल्या हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांना मार्च महिन्यांत सुरुवात करण्यात आली. मागील पाच महिन्यांत प्रामुख्याने सिमेंट व डांबरी अशा सुमारे ३४ रस्त्यांची कामे करण्यात आली असून, यातील डांबरी रस्त्यांचे काम अतिशय दर्जाहीन झाल्याची माहिती आहे. संबंधित रस्त्यांची ‘मोजमाप पुस्तिका’ तयार करणाºया व कामांवर आक्षेप घेणाºया कंत्राटी तीन अभियंत्यांची बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने पद्धतशीरपणे हकालपट्टी केली. हा प्रकार लक्षात घेता खुद्द मनपा प्रशासनाकडूनच कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरून घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे.शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे मनपा प्रशासनाने शासनाकडे हद्दवाढीची मागणी रेटून धरली होती. तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये ले-आउट नसल्यामुळे रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिव्यांसह पाणीपुरवठा आदी सुविधांची दानादान उडाल्याचे चित्र आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी शासनाने ९६ कोटी ३० लक्ष रुपये वितरित केले. मनपा क्षेत्रातील विकास कामांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्राप्त निधीतून दर्जेदार विकास कामे होतील, अशी अकोलेकरांना अपेक्षा आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार पाहावयास मिळत असल्यामुळे ही बाब मनपा आयुक्त संजय कापडणीस गांभीर्याने घेतील का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदारांसाठी पायघड्या; दर्जावर चुप्पीहद्दवाढ क्षेत्रासाठी मनपाने पहिल्या टप्प्यात ४५९ प्रस्तावांसाठी सहा निविदा प्रकाशित केल्या. यापैकी चार निविदा अर्ज प्राप्त होऊन त्यांना कार्यादेश देण्यात आले. सदर कामांची किंमत ५५ कोटी ४८ लक्ष रुपये आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यापासूनच मनपाने कंत्राटदारांसाठी पायघड्या अंथरल्याचे चित्र होते. परिणामी कंत्राटदार त्यांच्या पद्धतीने रस्त्यांचे बांधकाम करीत असून, कामांच्या दर्जावर मनपाने चुप्पी साधली आहे.अवघ्या वर्षभरात लागेल रस्त्यांची वाटभाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला तरी सिमेंट असो वा डांबरी रस्त्यांची कामे अतिशय दर्जाहीन होत असल्याची परिस्थिती आहे. सिमेंट रस्ता तयार केल्यानंतर अवघ्या सहा-सहा महिन्यांतच त्यावर भले मोठे खड्डे पडताना दिसत आहेत. हद्दवाढ क्षेत्रातही हीच परिस्थिती असून, अवघ्या वर्षभराच्या कालावधीत रस्त्यांची पुरती वाट लागणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला