दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असून दैनंदिन रेल फीडरवरून दिनोडा-मरोडा गावचा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात अवकाळी पाऊस येत आहे. पावसाच्या सरी येताच, विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता, तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात येते. तर कधी ब्रेकडाऊनच्या नावाखाली वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सदर प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असून याकडे संबंधित अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. रेल फीडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करावा व दिनोडा-मरोडा गावचा विद्युत पुरवठा कुटासा लाइनवर जोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दिनोडा-मरोडा गावचा सातत्याने वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:19 AM