अकोला- जीवनात नियमितपणाची दिनचर्या अत्यंत महत्त्वाची आहे. स्वास्थकर आरोग्यासाठी फळे, पालेभाज्या, प्रथिनेयुक्त सकस आहार घ्यावा, संतुलित दिनचर्या,पौष्टिक आहार व व्यायाम हेच सूत्र सातत्याने अंगिकारावे, असे आवाहन डॉ.जुगल चिराणिया यांनी केले.महिला व मुलींच्या आरोग्य कार्यास वाहिलेल्या पिंकथॉनच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी आयएमए सभागृहात आहार व व्यायामावर डॉ.जुगल चिराणिया यांचे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमात डॉ.चिराणिया यांनी, महिला -मुलींमधील भोजन नियमावली कशी असावी, त्यांचा दैनिक व्यायाम व चर्या कशी असावी,काय खावे ,शरीरासाठी आवश्यक बाबी यावर मार्गदर्शन करून पॉवर पॉईंटद्वारे व्याख्यान सादर केले. या कार्यक्रमात डॉ.राजेंद्र सोनोने, डॉ.पराग टापरे, विशाल पेटकर, मनीषा नाईक आदींचा डॉ.अपर्णाताई पाटील यांनी गौरव केला. आपल्या प्रास्ताविकात पिंकथॉनच्या प्रकल्प प्रमुख डॉ.अपर्णा पाटील यांनी या उपक्रमाची उपयुक्तता प्रतिपादित करून पिंकथॉनच्यावतीने अनेक रचनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. संचालन डॉ.अपर्णा पाटील यांनी तर आभार डॉ.शिल्पा चिराणिया यांनी मानले. यावेळी आशु मोरवाल, रिटा खंडेलवाल, नीलिमा टिंगरे, नीता अग्रवाल, डॉ.वंदना जोशी,डॉ.स्वाती चिमा ,डॉ.ममता अग्रवाल,प्रज्ञा बरेलिया ,डॉ.अंजली सोनोने,रश्मी पाटील,सुवर्णा सानप ,शिल्पा खेतान,प्रा.शारदा बियाणी ,आयएमए अध्यक्ष डॉ.साधना लोटे,डॉ.पुरुषोत्तम तायडे, डॉ.अर्चना टापरे,डॉ. उषा चिराणिया, डॉ.शहनाज खान, डॉ.मोनिका मलाकर, डॉ.सीमा तायडे, डॉ.सत्येन मंत्री, डॉ.प्रमोद चिराणिया ,डॉ.शिरीष थोरात,डॉ.अशोक ओळंबे,हरीश अलिमचंदानी समवेत सर्वं रोटरी क्लब,इनरव्हील,लायन्स सदस्य,आयएमए ,वुमन विंग ,श्रीराम ग्रुप आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)