अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात क्रिस्टल या खासगी कंपनी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे येथील ७० कर्मचाºयांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन पुकारले. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कर्मचाºयांना एक, दोन महिन्यांचे वेतन दिले, तरी शनिवारी हा बंद कायम राहणार आहे.सर्वोपचार रुग्णालयात क्रिस्टल या खासगी कंपनी अंतर्गत ७० कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. मागील चार महिन्यांपासून या कर्मचाºयांचे वेतन थकीत आहे. थकीत वेतनासंदर्भात कर्मचाºयांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ आश्वासन दिले जातात. शिवाय, जास्त विचारणा केल्यास नोकरीवरून काढण्याच्या धमक्यादेखील दिल्या जात असल्याचा आरोप कंत्राटी कर्मचाºयांनी केला. चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात लेबर कोर्टात तक्रार केली असता, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून धमकावण्यात आल्याचेही कर्मचाºयांचे म्हणणे आहे. कंपनीने वेतन करणार असल्याचे आश्वासन देऊन आठवडा झाला, तरी वेतनाचा पत्ता नाही. त्यामुळे अखेर सर्व कंत्राटी कर्मचाºयांनी थकीत वेतनासाठी शुक्रवारी काम बंद आंदोलन करत अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, चार महिन्यांचे थकीत वेतन देणे, पगार पत्रक देणे, विविध प्रकारच्या सुट्ट्या देणे, बोनस देणे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कामगार कल्याण आयुक्तांना दिले.आंदोलन सुरू होताच झाले वेतनचार महिन्यांपासून थकीत वेतनासाठी आंदोलन सुरू होताच शुक्रवारी कंत्राटी कर्मचाºयांच्या बँक खात्यात वेतन जमा झाले; परंतु काहींना तीन महिन्यांचे, तर काहींना केवळ एकाच महिन्याचे वेतन मिळाले.शनिवारीदेखील आंदोलन सुरूच राहणारआंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वेतन झाले, तरी आंदोलन हे दुसºयाही दिवशी कायम राहणार असल्याचे कंत्राटी कर्मचाºयांनी सांगितले.जीएमसी प्रशासनाची पंचाईतपालक मंत्री बच्चू कडू यांचा शनिवारी अकोला दौरा आहे. ते सर्वोपचार रुग्णालयालादेखील भेट देण्याची शक्यता आहे; मात्र ऐन वेळी कंत्राटी कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे.