शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

नियंत्रण कक्षात रोज ५० पेक्षा अधिक कॉल येतात; काही फेक तर काही छळाचे असतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:02 AM

The control room receives more than 50 calls a day : बहुतांश कॉल फेक असतात, पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर काही मिळत नाही.

- सचिन राऊत

अकोला : सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस आयुक्तालय किंवा ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या या नियंत्रण कक्षात दररोज ५० पेक्षा अधिक कॉल येतात. मात्र, यामध्ये बहुतांश कॉल फेक असतात, पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर काही मिळत नाही. जास्त करून महिला छळाच्या बाबतीत फोन येतात.

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अडचणीच्या वेळेस तत्काळ मदत मिळावी म्हणून डायल १०० नंबर, १०९८, ०७२४, २४३५५०० व जठार पेठ चाैकातील एका बॅँकेचा क्रमांक देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात २४ तास दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पाेलीस निरीक्षक, चार पाेलीस उपनिरीक्षक, पाच एएसआय, हेड काॅन्स्टेबल ११, नाइक पाेलीस अंमलदार ०७, पाेलीस अंमलदार १८ यांची ड्युटी लावण्यात आली आहे. २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोणाला जर मदत हवी असेल, तर नागरिक हेल्पलाइन नंबर डायल करतात. मदतीसाठी फोन आला की, तत्काळ त्याची दखल घेतली जाते. नाव, पत्ता घेऊन त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली जाते. पोलीस ठाण्याकडून तत्काळ गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निरोप दिला जातो. कर्मचारी घटनास्थळी जाऊन परस्थिती पाहतात. भांडणे सुरू असतील तर पोलीस ठाण्याची गाडी बोलावून घेतात. घरगुती भांडण असेल तर समजावून सांगतात अन्यथा पोलीस ठाण्यात येण्यास सांगतात.

 

शहरातून दररोज अनेक कॉल येतात त्याची तत्काळ दखल घेतली जाते. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कॉल देऊन घटनास्थळी पाठविले जाते. ग्रामीण भागातून व जिल्ह्याबाहेरूनही नियंत्रण कक्षाला कॉल येतात. येणाऱ्या प्रत्येक कॉलचे समाधान करतो. अडचणीत असलेल्या व्यक्तीला मार्गदर्शन करतो. दररोज फेक कॉलही येतात त्याचा आम्हाला नाइलाज असतो. शक्यतो अडचणीत असलेल्या किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य माहिती देण्यासाठीच लोकांनी नियंत्रण कक्षाला कॉल करावा.

- मोनिका राऊत, अपर पोलीस अधीक्षक, अकोला

सर्वाधिक कॉल महिलांचे

दररोज येणाऱ्या कॉलमध्ये महिलांच्या तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. पती मारहाण करत आहे. शेजारचे लोक भांडण करत आहेत. छेडछाड केली जात आहे. कोणी तरी पाठलाग करत आहे. कामाच्या ठिकाणी त्रास दिला जात आहे. अशा एक ना अनेक तक्रारी महिलांकडून नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितल्या जातात. अशा वेळी संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा दामिनी पथकाला महिलांच्या मदतीसाठी पाठविले जाते.

 

दररोज किमान ०९ फेक कॉल

- रात्री-अपरात्री कोणीतरी फोन करत अमुक या ठिकाणी हाणामारी होत आहे तेव्हा पोलीस घटनास्थळी जातात, मात्र तेथे काही नसत. मग फोन कोणी केला त्याचा शोध घेतला जातो.

- पती-पत्नीची भांडणे होतात. पत्नी १०० नंबरला फोन करते. पोलीस कॉल करणाऱ्या महिलेच्या घरी जातात तेव्हा दोघांची भांडणे मिटलेली असतात. पोलिसांना याचा नाहक त्रास होतो.

अशा प्रकारे दररोज किमान ९ ते १० फेक कॉल येतात. फेक कॉल करून त्रास देणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जातात.

कॉल कोठून आला याची तत्काळ माहिती नियंत्रण कक्षाला समजते.

 

कंट्राेल रूमला आलेले काॅल

जून ९७५

जुलै १०५४

ऑगस्ट ३६३

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस