अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजना मार्गी लावण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे. त्यासाठी अध्यक्ष शरद गवई यांनी सोमवारी सभापतींसोबत चर्चा केली; मात्र या चर्चेतून कोणताही निर्णय न झाल्याने सभेची तारखी ठरविता आली नाही. बांधकाम विभागाच्या वाट्याला आलेला सेसच्या निधीतून करावयाची कामे आणि समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागांच्या योजना रखडल्याने जिल्हा परिषद सभागृहात सदस्यांनी तोडफोड केली होती. एकीकडे योजना रखडल्या असताना दुसरीकडे सभा सुरू करण्यास होत असलेल्या विलंबामुळे सदस्य संतप्त झाले होते. आता विशेष सभा बोलावून सर्व विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सोमवारी सर्व सभापतींसोबत अध्यक्षांनी चर्चा केली; मात्र विशेष सभा बोलाविण्याच्या निर्णयावर एकमत न झाल्याने सभेची तारीखच निश्चित करता आली नाही.
योजना मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविणार!
By admin | Published: February 16, 2016 1:41 AM