दीक्षांत समारंभाचे नियोजन राज्यपाल तथा कुलपती कृषी विद्यापीठे आणि राज्याचे कृषिमंत्री तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे यांचे पूर्वपरवानगीने तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या व विद्या परिषदेच्या मान्यतेने करण्यात आले होते. सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्याकरिता रीतसर परवानग्यासुद्धा घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, काही विद्यार्थी प्रतिनिधींनीसुद्धा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला विनंती केली होती. या बाबी लक्षात घेता व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शासनाकडून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या सूचनांनुसार विद्यापीठ विद्या परिषद (१८४ व्या) व कार्यकारी परिषदेच्या (३३२व्या) तातडीच्या सभेत, राज्यपाल तथा कुलपती कृषी विद्यापीठे कार्यालय आणि राज्याचे कृषिमंत्री तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे यांचे मान्यतेने सदर दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.
कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:20 AM