शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विद्यार्थ्यांच्या खिशाला ‘नीट’ कात्री

By admin | Published: June 04, 2016 2:37 AM

शिकवणी वर्ग, खानावळ, घरभाड्याचे पैसे वाया!

अकोला : मेडिकलला प्रवेश घेऊन इच्छिणार्‍या अकोल्यासह अन्य जिल्हय़ांतील विद्यार्थ्यांनी हजारो रुपये भरून महिनाभरासाठी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) मार्गदर्शनाचे शिकवणी वर्ग लावले. खानावळसह घरभाडेसुद्धा भरले आणि आता वर्षभरासाठी नीट रद्द करण्याचा केंद्र सरकारचा वटहुकूम निघाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे.अनेक विद्यार्थ्यांनी एमएटी-सीईटीसाठी वर्षभर अभ्यास केला आणि ऐनवेळी ही परीक्षा रद्द करून नीट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी खिन्न झाले. त्यातही विद्यार्थ्यांनी मानसिक तयारी करीत नीटचे आव्हान स्वीकारले. त्यातच न्यायालयात वारंवार केल्या जाणार्‍या फेरयाचिका व राज्य शासनाकडून दिले जाणारे नुकसान होऊ न देण्याचे आश्‍वासन यामुळे सीईटी की नीट, या संभ्रमात विद्यार्थी व पालक होते.तथापि, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हटल्यावर आता नीटच होणार, असे पालक व विद्यार्थ्यांनी गृहीत धरले आणि शहरात पुन्हा महिनाभरासाठी नीटच्या अभ्यासासाठी हजारो रुपये शुल्क भरून शिकवणी वर्ग लावले. खानावळ, घरभाड्याचे पैसेही भरले. विद्यार्थ्यांचे क्लासेसही सुरू झाले; परंतु अवघ्या काही दिवसांतच केंद्र शासनाने वटहुकूम जारी केला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला खरा; परंतु त्याचे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले.