अकोला: मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी पक्षाचा अधिकृत गटनेता निवडण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस नगरसेवकांवर सोपवली. आपसात समन्वय साधून शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत गटनेता निवडण्याचा सल्ला गुरुवारी पार पडलेल्या टिळक भवनमधील बैठकीत दिला. महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक २0 मार्चपूर्वी पार पडेल. आजरोजी पक्षाच्या गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले. काँग्रेसच्या १८ नगरसेवकांपैकी चार ते पाच नगरसेवकांचा गटनेता दिलीप देशमुख यांच्या नावाला विरोध आहे. अशास्थितीत स्थायी समितीसाठी विभागीय आयुक्तांकडे गटनेत्यांचे नाव निश्चित करण्याची वेळ आल्यानंतरच काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला. गटनेता निवडीचा तिढा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दालनात सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांना मुंबईत पाचारण करण्यात आले. गुरुवारी टिळक भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत चव्हाण यांनी शहर अध्यक्ष मदन भरगड, गटनेता दिलीप देशमुख, साजीद खान यांच्यासोबत चर्चा केली असता, आपसात समन्वय साधून शुक्रवारी दुपारपर्यंत गटनेता निवड करण्याचे निर्देश दिले. तसे न झाल्यास स्वत: गटनेता निवडणार असल्याचे स्पष्ट केले
समन्वय साधा, गटनेता निवडा!
By admin | Published: March 13, 2015 1:35 AM