अकोला :अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शुक्रवार, ३ जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला. तर सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ८४ वर गेला असून, एकूण बाधितांची संख्याही १६१४ झाली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी एकूण ७३ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण पातूर, मोठी उमरी अकोला, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद जि. बुलडाणा(हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे), बार्शीटाकळी, बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत १२०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३३० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशानाने स्पष्ट केले आहे.६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यूशुक्रवारी पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण ६५ वर्षीय पुरुष असून, ते शंकरनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना २३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८४ झाला आहे.प्राप्त अहवाल-७३पॉझिटीव्ह अहवाल-सातनिगेटीव्ह-६६
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १६१४मयत-८४ (८३+१)डिस्चार्ज-१२००दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३०