अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख किंचित घसरणीला लागला असला, तरी मृत्यूसत्र मात्र थांबण्याची चिन्हे नाहीत. शनिवार, २९ रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १०६४ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ७५ असे एकूण २२० रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ५५२८२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पिंजर ता.बार्शीटाकळी येथील सहा महिन्याची बालिका, देवर्डा ता. अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष, पातुर येथील ५५ वर्षीय महिला, अकोलखेड ता. अकोट येथील ७० वर्षीय महिला, कार्ला ता. पातुर येथील ६२ वर्षीय पुरुष, सकनी ता. बार्शीटाकली येथील ६५ वर्षीय पुरुष, वाई ता. मूर्तिजापूर येथील ६१ वर्षीय महिला व
सांगवी ता.तेल्हारा येथील ६२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर- १८, अकोट-१७, बाळापूर-१२, बार्शीटाकळी- सहा, पातूर- १३, तेल्हारा- १६ अकोला- ६३. (अकोला ग्रामीण-१८, अकोला मनपा क्षेत्र-४५)
४७८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, खासगी कोविड रुग्णालयांमध्यील ३८ व होम आयसोलेशन मधील ४२५ अशा एकूण ४७८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४,८६१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५,२८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४९,३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०६४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,२९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.