लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ संशयित रुग्ण आढळले असून, ते सर्व विदेशातून आले होते; परंतु रविवारी स्थानिक संसर्गातून तीन नवे संशयित समोर आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा ‘कोरोना’ तिसºया पायरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची शक्यता नाकारता येत नाही.आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु गत दोन दिवसांपासून पुणे-मुंबईसह देशातील इतर शहरातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रविवारपर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात ७११ देशांतर्गत प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशातच तीन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही रुग्ण स्थानिक असून, ते स्थानिक संसर्गातून आजारी पडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अकोलेकर कोरोनाच्या तिसºया पायरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळणे आवश्यक झाले आहे.तिन्ही रुग्ण अतिदक्षता कक्षात तिन्ही संशयित रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच त्यांना निमोनियाची लक्षणे असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.‘कोरोना’सोबतच ‘स्वाइन फ्लू’ची तपासणी तिन्ही रुग्णांना असलेली लक्षणे पाहता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांचे नमुने स्वाइन फ्लू (एच-१ एन-१), तसेच कोरोनाच्या तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. संशयित रुग्णांना श्वास घेण्यास होणारा त्रास आणि निमोनियाची लक्षणे असल्याने आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
CornaVirus : अकोला तिसऱ्या पायरीच्या उंबरठ्यावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:28 AM