अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून, दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालामध्ये आणखी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये पाच अहवाल रॅपिड ॲन्टिजेन चाचणीतील तर ३४ अहवाल आरटीपीसीआर चाचणीतील आहेत. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असून, शुक्रवारी त्यात आणखी ३९ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या प्राप्त ३४ अहवालांमध्ये कौलखेड येथील पाच, तेल्हारा व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, जठारपेठ, लक्ष्मी नगर, भागवत प्लॉट, बोरगाव मंजू, गीता नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी दोन, तर लहान उमरी, गड्डाम प्लॉट, गिरी नगर, राजेश्वर मंदिर, शास्त्री नगर, रामदास पेठ, न्यू तापडीया नगर, नामदेव नगर, झाडगा (ता. बार्शीटाकली), खडकी व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले पाच अशा १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण ११,०८३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी १० हजार १३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे ३२६ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना : ३९ पॉझिटिव्ह, १८ जणांना डिस्चार्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:21 AM