शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Corona in Akola : बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:08 AM

Corona in Akola: गत चार दिवसांत २,८५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १८३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठांमधील गर्दी ओसरली असून, त्याचे चांगले परिणाम आता समोर येत आहेत. रुग्णसंख्या सातत्याने घटत असून, त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना किंचित दिलासा देणारी बाब आशेचा किरण म्हणून समोर येत आहे. नव्याने बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली असून, गत चार दिवसांत २,८५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १८३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

गतवर्षी डिसेंबर अखेरीस घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून पुन्हा उंचावला असून, ही लाट एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्च पातळीवर पोहोचली आहे. शंभर ते दोनशेच्या घरात नोंदविली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ७०० पर्यंत जाऊन ठेपली आहे. सोबतच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णसंख्या दररोज नवनवा विक्रम प्रस्थापित करत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने एक मे पर्यंत कडक निर्बंध लागू केल्याने बाजारपेठांमधील गर्दी ओसरली असून, त्याचे चांगले परिणाम आता समोर येत आहेत. शनिवार, २३ एप्रिलपासून नव्याने पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या सातत्याने घटत असून, त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गत चार दिवसांत तब्बल २८५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर या कालावधीत नव्या १८३४ रुग्णांची भर पडली आहे.

 

मृत्युसत्र रोखण्याचे आव्हान

अकोला जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख किंचित घटत असला, तरी कोरोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गत चार दिवसांतच ४५ जण कोरोनामुळे दगावले आहेत. लक्षणे गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत रुग्णालयात न जाण्याच्या रुग्णांच्या प्रवृत्तीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

लक्षणे दिसताच चाचणी करून घेऊन उपचार घेतल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. काही रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात, त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अंगावर दुखणे न काढता तातडीने चाचणी करून घेऊन उपचार सुरू करावा.

- डॉ. राजकुमार चव्हाण.

जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

गत चार दिवसांतील रुग्णसंख्येचा आलेख

शनिवार

पॉझिटिव्ह कोरोनामुक्त

४९४ ५९४

 

रविवार

पॉझिटिव्ह कोरोनामुक्त

४६९             ७७५

 

सोमवार

पॉझिटिव्ह कोरोनामुक्त

३७१             ७३७

 

मंगळवार

पॉझिटिव्ह कोरोनामुक्त

५००             ७५२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला