अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी (दि. २७) आणखी दहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १०४७ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५४, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये ५१ असे एकूण २०५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४,७९२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ८८६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये हिंगणा ता.पातूर येथील ७० वर्षीय पुरुष, खिरपुरी येथील ७४ वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, गौलखेडी ता.मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष, अजनी ता.बार्शीटाकळी येथील ४८ वर्षीय पुरुष , पाथर्डी ता. तेल्हारा येथील ६३ वर्षीय रुग्ण, बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला, दिनोडा ता.अकोट येथील ४५ वर्षीय महिला, सुकोडा येथील ८० वर्षीय महिला व पातूर येथील ६०वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-१८, अकोट-५६, बाळापूर-सहा, बार्शीटाकळी- सहा, पातूर-तीन, अकोला- ६५ (अकोला ग्रामीण-२१, अकोला मनपा क्षेत्र- ४४)
५७४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, खासगी कोविड रुग्णालयांमधील ६५, तर होम आयसोलेशन मधील ४७० अशा एकूण ५७४ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,२९६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४,७९२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४८,४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०४७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,२९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.