अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, शुक्रवारी आणखी ११ जणांचा कोविडने बळी घेतला आहे, तर ७१४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना शुक्रवारी ४४८ जणांनी कोरोनावर मात केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, मात्र नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, आरटीपीसीआर चाचणीचे ५३१, तर रॅपिड चाचणीचे १८३ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. या शिवाय, ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये उरळ येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णासह बाळापूर येथील ७१ वर्षीय महिला, डाबकी रोड येथील ७४ वर्षीय पुरुष, पातूर येथील ६० वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ५६ वर्षीय पुरुष, अकोट फैल येथील ६२ वर्षीय पुरुष, खदान येथील ८० वर्षीय महिला, रणपिसे नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, अकोट येथील ५० वर्षीय पुरुष, म्हैसपूर येथील ७५ वर्षीय महिला, डोंगरगाव येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ७६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ३७ हजार ३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत सहा हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
तालुकानिहाय रुग्ण
तालुका - रुग्णसंख्या
मुर्तिजापुर -२२
अकोट -११६
बाळापूर -३७
तेल्हारा -२८
बार्शिटाकळी -३८
पातूर -४९
अकोला - २४१ (ग्रामीण-८८, मनपा क्षेत्र-१५३)