अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, ६ मे रोजी आणखी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७५४ झाला आहे. तर गत चोविस तासात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५०८, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १७२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ४३,८०१ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,७१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,२०९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ५९, अकोट तालुक्यातील ११, बाळापूर तालुक्यातील ५०, तेल्हारा तालुक्यातील २८ , बार्शी टाकळी तालुक्यातील २६, पातूर तालुक्यातील ४४ आणि अकोला - २९० (अकोला ग्रामीण- ७५, अकोला मनपा क्षेत्र- २१५) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा मृत्यू
बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष
पातूर येथील ७० वर्षीय पुरुष
बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला
जवाहर नगर येथील ५० वर्षीय पुरुष
निंबी ता.बार्शीटाकळी
बाभूळगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय महिला
सौदांळा ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष
रामटेकपूर ता.अकोट येथील ४५ वर्षीय महिला
कोथळी खु. ता.बार्शीटाकळी येथील ९० वर्षीय पुरुष
कौलखेड येथील ६२ वर्षीय पुरुष
मुंडगाव ता.अकोट येथील ३० वर्षीय महिला
४५९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील सहा, उसाई हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, होले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३९० अशा एकूण ४५९ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,१८७ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३,८०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३६,८६० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,१८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.