अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, रविवार, ९ मे रोजी आणखी १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ७९९ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५५०, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २१० असे एकूण ७६२ रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ४५,८०० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,२९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,७४४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी दिवसभरात १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पातूर येथील ७० वर्षीय महिला, बाळापूर नाका येथील २४ वर्षीय महिला, जीएमसी क्वॉटर येथील ६९ वर्षीय महिला, अकोट येथील ६० वर्षीय महिला, डोंगरगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, कौलखेड येथील ५८ वर्षीय महिला, खदान येथील ५९ वर्षीय पुरुष, अकोट येथील ४५ वर्षीय महिला, कावसा ता.अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष, खामखेड ता.पातूर येथील ६१ वर्षीय महिला आणि मलकापूर येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
मुर्तिजापुर - ६१
अकोट - १०२
बाळापूर - २७
तेल्हारा -१३
बार्शीटाकळी-३८
पातूर- ३७
अकोला - २७२(अकोला ग्रामीण- ५२, अकोला मनपा क्षेत्र-२२०)
५३९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील चार, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, समाज कल्याण वसतीगृह येथील आठ, केअर हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील ४५० अशा एकूण ५३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,५६४ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५,८०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३८,४३७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७९९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.