अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, गुरुवार, १३ मे रोजी आणखी १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८५१ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५६१, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १९५असे एकूण ७५६ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४८,५५३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,५१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,९५६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी दहाजणांच्या मृत्यूची नोंद झाली. खेतान नगर येथील ७६ वर्षीय पुरुष, दहिहांडा ता. अकोट येथील ७५ वर्षीय महिला, किनखेड ता. अकोट येथील ७१ वर्षीय महिला, घोडेगाव ता. तेल्हारा येथील ६५ वर्षीय पुरुष, पातूर येथील ५५ वर्षीय महिला, काळेगाव ता. तेल्हारा येथील ८२ वर्षीय पुरुष, राजंदा ता. बार्शीटाकळी येथील ५८ वर्षीय पुरुष, शिवर येथील ६४ वर्षीय पुरुष, गोरेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला, न्यु तापडीया नगर येथील ८३ वर्षीय महिला, अकोट येथील ३४ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर- ४४, अकोट-२४, बाळापूर-६३, तेल्हारा-११०, बार्शी टाकळी-३४, पातूर-७६, अकोला-२१० (अकोला ग्रामीण-५६, अकोला मनपा क्षेत्र-१५४)
८४५ कोरोनामुक्त
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३७, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, मुलांचे वसतीगृह मुर्तिजापूर येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, खासगी रुग्णालयांमधील ५९ आणि होम आयसोलेशन मधील ७२८ अशा एकूण ८४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,७०९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८,५५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४०,९९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,७०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.