अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १८ मे रोजी आणखी १६ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९४३ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८२, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १४३ असे एकूण ४२५ रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ५१,१५६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,९१४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८२जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,६३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये खानापूर वेस ता.अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष, किनखेड येथील ७३ वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ४८वर्षीय पुरुष, दोनद बु. ता. बार्शीटाकळी येथील ४३ वर्षीय पुरुष, वाशिंबा येथील ६२ वर्षीय महिला, सांगवी जोंगदेव ता.बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष, कोळविहीर ता. अकोट येथील ४५ वर्षीय महिला, गणेश नगर, अकोला येथील ७५ वर्षीय पुरुष, पारंडा ता. बार्शीटाकळी येथील ८१ वर्षीय महिला, बाळापूर नाका अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ६५ वर्षीय पुरुष, मुर्तिजापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, पातूर येथील ६१ वर्षीय महिला, पुनोती ता. बार्शीटाकळी येथील ५८ वर्षीय महिला , गिरी नगर येथील ७६ वर्षीय महिला, अकोली खुर्द येथील ३६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
मुर्तिजापुर-११, अकोट-१०, बाळापूर-५५, तेल्हारा-एक, बार्शी टाकळी-२१, पातूर-२९, अकोला-१५५. (अकोला ग्रामीण-२९, अकोला मनपा क्षेत्र-१२६)
४७७ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, मुलांचे वसतीगृह येथील नऊ, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील दोन, खासगी रुग्णालयांमधील ५३ तर होम आयसोलेशन मधील ३७० अशा एकूण ४७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,५९५ ॲक्टिव्ह रुगण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१,१५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४३,६१८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.