अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, सोमवार, १० मे रोजी आणखी १८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८१७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३०९, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १६७ असे एकूण ४७६ रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ४६,२७६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,६२२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,३१३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी दिवसभरात १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. कौलखेड येथील ६० वर्षीय महिला, दहिहांडा येथील ६५ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ७३ वर्षीय पुरुष, दहिहांडा येथील ७० वर्षीय पुरुष, आंबोडा ता.अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष, मुंडगाव ता.अकोट येथील ४६ वर्षीय पुरुष, वर्धमान नगर येथील ५५ वर्षीय महिला, नांदखेड ता. अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष, आश्रय नगर येथील ९६ वर्षीय महिला, अकोट येथील ४९ वर्षीय पुरुष, शरद नगर येथील ४९ वर्षीय पुरुष , कापसी ता. पातूर येथील ७४ वर्षीय पुरुष, अजनी ता.बार्शीटाकळी येथील ३६ वर्षीय पुरुष, अकोट फैल येथील ५० वर्षीय पुरुष, बापूनगर अकोट फैल येथील ३८ वर्षीय पुरुष, हरिहर पेठ येथील ८० वर्षीय पुरुष, तापडीया नगर येथील ४६ वर्षीय पुरुष आणि बाळापूर येथील ४१ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
मुर्तिजापुर- ३२
अकोट- १९
बाळापूर- ०९
तेल्हारा- ३०
बार्शी टाकळी- ०८
पातूर- ०८
अकोला- २०३ (अकोला ग्रामीण-९९, अकोला मनपा क्षेत्र-१०४)
५७५ जणांची कोरोनावर मात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, समाज कल्याण वसतीगृह येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पीटल येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथील १०, लोहना हॉस्पीटल येथील एक, जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील तीन, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील १५, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील तीन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, फातिमा हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील चार, काळे हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील एक तर होम आयसोलेशन मधील ४३५ अशा एकूण ५७५ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,४४७ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६,२७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३९,०१२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८१७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,४४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.