अकोला : जिल्ह्याला बसलेला कोरोनाचा विळखा सैल झाला असून, शनिवार, २६ जून रोजी आरटीपीसीार चाचण्यांमध्ये १२, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १५ अशा एकूण आणखी २७ नव्या रुग्णांची भर पडली, तर १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७,५५६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी एकूण ७४८ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ७३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १२ जणांमध्ये अकोट-दोन, बाळापूर-पाच, पातूर-एक, व अकोला मनपा क्षेत्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या ८८३ रॅपिड चाचण्यांमध्ये केवळ १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
१४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक व खासगी कोविड रुग्णालयांमधील ९ अशा एकूण १४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४२६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,००४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.