अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत असून, गत पाच महिन्या प्रथमच नव्याने बाधित होणार्यांचा आकडा ५० पेक्षाही कमी आला आहे. सोमवार, ७ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११०४ झाला आहे. आरटीपीसीअार व रॅपिड चाचण्यांमध्ये एकूण ४२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आतापर्यंत बाधित होणार्यांची संख्या ५६७०४ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५१० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४८३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी सांगळूद येथील ७० वर्षीय पुरुष व गडंकी येथील ५९ वर्षीय पुरुष अशा दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. दोघांनाही अनुक्रमे १ व ५ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
तालुकानिहाय रुग्णसंख्या (आरटीपीसीआर)
अकोट-तीन, पातूर-नऊ, अकोला-१५. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-१४)
८८३ रॅपिड चाचण्यांमध्ये १५ पॉझिटिव्ह
रविवार, ५ जून रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या ८८३ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
३०८ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमधील २१, तर होम आयसोलेशन मधील २७० अशा एकूण ३०८ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
२,५०८ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,७०४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५३,९०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,५०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.