अकोला: गत आठवडाभरापासून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली तरी मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. शुक्रवारी आणखी ९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १९५ अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे ४३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी ९ जणांचा कोराेनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये बाळापूर येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णासह जिल्हा परिषद कॉलनी येथील ७५ वर्षीय महिला, अकोट तालुक्यातील मार्डी येथील ६५ वर्षीय पुरुष, लहान उमरी येथील ७५ वर्षीय महिला, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथील ५५ वर्षीय पुरुष, कृषी नगर येथील ७० वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ८० वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी तालुक्यातील येरंडा येथील ७० वर्षीय महिला तसेच अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूचे हे सत्र सुरू असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गत आठवडाभरापासून वाढले आहे. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ६२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यापैकी ४८ हजार ८७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत १ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुकानिहाय रुग्ण (आरटीपीसीआर चाचणी)
तालुका - रुग्ण
मुर्तिजापूर -३८
अकोट -२७
बाळापूर -१६
बार्शिटाकळी - ६
पातूर -९
तेल्हारा -३१
अकोला -६८ (ग्रामीण-१४, मनपा -५४)