अकोला : जिल्ह्यात १३ जून रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १११२ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २९, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १६ असे एकूण ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७,१४६ झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९५३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित ९२४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी दिवसभरात एका मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण माळीपुरा येथील ८६ वर्षीय पुरुष असून, त्यांना १० जून रोजी दाखल केले होते.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
मुर्तिजापूर-एक, बार्शीटाकळी-एक, बाळापूर-तीन, अकोट-एक, पातूर-एक, तेल्हारा-पाच, अकोला-१७. (अकोला ग्रामीण-३, अकोला मनपा क्षेत्र-१४)
१९९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, खासगी कोविड रुग्णालयांमधून २१, तर होम आयसोलेशन मधील १७० असे एकूण १९९ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,४२२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,१४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५४,६१२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,११२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.