अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरत असला, तरी मृत्युसत्र सुरुच असून, गुरुवार, ३ जून रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीचा आकडा १०८८ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२३, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये ५८ असे एकूण १८१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ५६,२३९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,१७२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,०४९अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष, उरळ ता. बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ६४ वर्षीय पुरुष, अकोट येथील ८३ वर्षीय पुरुष, खानापूर येथील ७० वर्षीय पुरुष, आनंद नगर येथील ६५ वर्षीय पुरुष, शिवणी येथील ७१ वर्षीय पुरुष, नागेवाडी, अकोला येथील ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-२७, अकोट-पाच, बाळापूर-१८, बार्शीटाकळी- सात, पातूर-दोन, तेल्हारा-१३ अकोला-५१. (अकोला ग्रामीण-सात, अकोला मनपा क्षेत्र-४४)
४१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, खासगी कोविड रुग्णालयांमधील २६, तर होम आयसोलेशन मधील ३८० अशा एकूण ४१९ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,६४८ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,२३९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५१,५०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,६४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.