अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरत असला, तरी मृत्यूसत्र सुरुच असून, बुधवार, २ जून रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळीचा आकडा १०८० वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४८, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ४१ असे एकूण १८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ५६,०५८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५६१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,४१३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पांगरा ता. पातूर येथील ७० वर्षीय पुरुष, विवरा ता. पातूर येथील ४० वर्षीय पुरुष, दाताळा ता. मुर्तिजापूर येथील ५५ वर्षीय महिला, शिव नगर येथील ५६ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील २३ वर्षीय महिला, अकोट येथील ४६ वर्षीय पुरुष, बोरगाव मंजू येथील ६९ वर्षीय पुरुष, बाजोरीया नगर येथील ६६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-सहा, अकोट-६२, बाळापूर-२१, बार्शीटाकळी- नऊ, पातूर-दोन, तेल्हारा-१९ अकोला- २९. (अकोला ग्रामीण-चार, अकोला मनपा क्षेत्र-२५)
४०८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, खासगी कोविड रुग्णालयांमधील ३७, तर होम आयसोलेशन मधील ३५० अशा एकूण ४०८ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,०५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५१,०८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०८० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.