अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाला ब्रेक लागला असून, रविवार, १८ जुलै रोजी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन मिळून करण्यात आलेल्या एकूण ४७५ चाचण्यांमध्ये केवळ दोन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, आणखी दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हिआरडीएल लॅबकडून रविवारी १९१ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ अकोला शहर व अकोला ग्रामीण भागातील प्रत्येकी एक अशा दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह असून, उर्वरित १८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी दिवसभरात करण्यात आलेल्या २८४ रॅपिड चाचण्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून, यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.
४५ ॲक्टिव्ह रुग्ण
रविवारी बिहाडे हॉस्पीटल येथील एक व आयकॉन हॉस्पीटल येथील एक अशा दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. आता केवळ ४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.