अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, २९ एप्रिल रोजी आणखी १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६७८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५०४, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये १६८ अशा एकूण ६७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३९,६२३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५५३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ५०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०४९ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ७८, अकोट तालुक्यातील ६७, बाळापूर तालुक्यातील २५, तेल्हारा तालुक्यातील ३७, बार्शी टाकळी तालुक्यातील २०, पातूर तालुक्यातील ३३ आणि अकोला - २४४ (अकोला ग्रामीण- २८, अकोला मनपा क्षेत्र- २१६) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा मृत्यू
अक्कलकोट भोईपूरा येथील ७६ वर्षीय पुरुष
कैलास नगर येथील ५५ वर्षीय महिला
जनूना ता. बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय महिला
मोठी उमरी ताथोड नगर येथील ६८ वर्षीय पुरुष
मोठी उमरी येथील ४२ वर्षीय महिला
अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष
पारस ता. बाळापूर येथील ६० वर्षीय
दहिहांडा येथील ८१ वर्षीय पुरुष
अन्वी मिर्झापूर येथील ६२ वर्षीय पुरुष
मूर्तिजापूर येथील ७२ वर्षीय महिला
४३८ कोरोनामुक्त
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर येथील ५४ तर होम आयसोलेशन मधील ३१५ अशा एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,२४४ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३९,६२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३३,७०१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६७८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,२४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.