अकोला : जिल्ह्यात रविवार, २४ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये एक, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५२ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोला शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, तर उर्वरित १५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या रॅपिड चाचण्यांमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.