अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २८ मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ११८ असे एकूण २९३ रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा २७,११७ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,००८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा व पारस येथील प्रत्येकी ११, पळसखेड व मलकापूर येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सहा, गोरक्षण रोड, शिवर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी, डाबकी रोड, कुंभारी, एमआयडीसी व गोकूल कॉलनी येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, दानापूर, जीएमसी, अकोट, येवता, लहान उमरी, मोठी उमरी व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, गाडगे प्लॉट, हरिहर पेठ, शास्त्री नगर, नवरंग सोसायटी, गीता नगर, वाशिम बायपास, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, पातूर, सिंधी कॅम्प, बाळापूर व व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी दोन, मडकेवाडी, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, देशपांडे प्लॉट, आयकॉन हॉस्पिटलजवळ, गणपती गल्ली, खरप, मुर्तिजापूर, वरखेड, खिरपूर बु., टाकळी, ताजनगर, इंद्रायणी कॉलनी, हिंगणा, आरटीओ रोड, श्रद्धा नगर, रामदासपेठ, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, आदर्श कॉलनी, जूने शहर, स्नेहा नगर, खोलेश्वर,माणिक टाँकीज, बोरगाव मंजू, बाबुळगाव जहॉगीर, वाजेगाव, नया अंदुरा, अमंतपूर, विझोरा, गुडधी, बिर्ला रेल्वे क्वॉटर, पनखेड, तापडीया नगर, चांदुर, सावंतवाडी, कंवरनगर, नयागाव, बाळापूर नाका, लेडी हार्डींग, बाबुळगाव, बाळापूर रोड, वनी, पिंपळखुटा, हिंगणा, जैन चौक, पंचशिल नगर व तारफैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
६,९३९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,११७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,९३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.