अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २७ मार्च रोजी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४४३ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८८ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १८८ असे एकूण ४७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण संख्या २६,८२४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,२७९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील १५, बार्शीटाकळी येथील १३, डाबकी रोड व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, तेल्हारा येथील १०, मोठी उमरी येथील नऊ, हिंगणी बु. येथील आठ, सिंधी कॅम्प, जठारपेठ व लहान उमरी येथील प्रत्येकी सात, देऊळगाव, कृषी नगर, राऊतवाडी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, गीता नगर, आदर्श कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी चार, कीर्ती नगर, मलकापूर देहगाव, बाळापूर, तोष्णीवाल लेआऊट व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन, घुसर, रामदासपेठ, कारंजा राम, पातूर, धानोरा वैद्य, ताथोड नगर, गुडधी, खडकी, हिंगणा रोड, सावतवाडी, गोरक्षण रोड, बंजारा नगर, व्हीएचबी कॉलनी व आरोग्य नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोकमान्य नगर, फडके नगर, महात्मा फुले नगर, हामजा प्लॉट, गणेश नगर, राहनपूर, शहापूर, रुधडी, रुईखेड, पोपटखेड, केळीवेळी, नयागाव, पीकेव्ही, कान्हेरी सरप, शिवाजी पार्क, रिधोरा, चांगलवाडी, सिरसोली, खंडाला, खैरखेड, मेहकर, ताजनगर, सिव्हिल लाईन, रेणुका नगर, दत्त नगर, क्रांती चौक, बोरगाव, रतनलाल प्लॉट, सुकोडा, उरळ, वाडेगाव, मूर्तिजापूर, विरवाडा, जुना राधाकिशन प्लॉट, शिवणी, लीगल टॉकिज, इकबाल कॉलनी, सिद्धार्थ नगर, लाईपुरा, शिवाजी नगर, तिलक रोड, आश्रय नगर, हरिहर पेठ, सोनाला, जवाहर नगर, तारफैल, भौरद, तापडीया नगर, दहिगाव गावंडे, कोठारी, एमआयडीसी, न्यू जैन टेम्पल, कुंभारी, आळसी प्लॉट, वृंदावन नगर, जुने शहर, पिंजर, कौलखेड, एमरॉल्ड कॉलनी, कपिलवास्तू नगर, गायत्री नगर, रचना कॉलनी, चांदणी पोलीस स्टेशन, हिंगणा, शिलोड सुकोडा, कोठारी वाटीका, आपातापा, खदान व केशवनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी बाळापूर येथील १०, पळसखेड येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, अंतरी बु. व पातूर येथील प्रत्येकी चार, नया अंदुरा येथील तीन, नंदापूर ता.मुर्तिजापूर येथील दोन, गायगाव, निंबा, खडकी, खानापूर ता.पातूर व अंभोरा ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एक महिला, तीन पुरुष दगावले
कोरोनावर उपचार सुरु असलेल्या तेल्हारा येथील ५५ वर्षीय पुरुष, लहान उमरी, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष, अकोली जहागीर ता.मुर्तिजापूर येथील ७४ वर्षीय महिला व जूने शहर, अकोला येथील ६९ वर्षीय पुरुष अशा चौघांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघांनाही अनुक्रमे, १६ मार्च, २६ मार्च, २३ मार्च व २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
६,६४६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६,८२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,६४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.