अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, ३ एप्रिल रोजी आणखी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४६६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४८, तर रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये १०६ अशा एकूण २५४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २८,५२९ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९२० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७२ अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी चार मृत्यूची नोंद झाली. मलकापूर, अकोला येथील ६५ वर्षीय महिला, पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ७२ वर्षीय पुरुष, निंबा ता.बाळापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, जूने शहर, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष या चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या ठिकाणी आढळले रुग्ण
सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील १८, अकोट येथील १५, मलकापूर येथील आठ, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी सहा, कौलखेड येथील पाच, बाळापूर येथील चार, आदर्श कॉलनी, घुसर, राजंदा ता.बार्शीटाकळी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, शिवार, जीएमसी, बंजारा नगर, देगाव, सहकार नगर, बोरगांव मंजू, लक्ष्मी नगर, अलंदा, शिवसेना वसाहत, शिवणी, पैलपाडा, खडकी, केशव नगर, देशमुख फैल, न्यु तापडीया नगर, जठारपेठ व पिंजर बार्शीटाकळी येथील प्रत्येकी दोन, रेल्वे कॉलनी, रिधोरा, पंचशिल नगर, छोटी उमरी, म्हैसांग, नकाशी, वाडेगाव, कानशिवणी, पाथर्डी ता.तेल्हारा, नया अंदुरा, हाता, निंबा, जयहिंद चौक, तारफैल,रामधन प्लॉट, सोपीनाथ पनगर, मालीपुरा, रामदासपेठ, खोलेश्वर रोड, बार्शीटाकळी, शिवनगर, रामनगर, तुकाराम चौक, आलेगाव ता.पातूर, खरप, खिरपूर, खुर्द, खेडकर नगर, जवाहर नगर, न्यु हिंगणा, रणपिसे नगर, मोठी उमरी, लहरिया नगर, हातरुण ता.बाळापूर, जूने शहर, गुडधी, हमजा प्लॉट, रायगड कॉलनी, येळवन व अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
५,२७४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८,५२९जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २२,१६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,२७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.