लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत असून, त्यांच्यासाठी दररोज जवळपास ४५० आॅक्सिजन सिलिंडर लागत आहेत. कोविडचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी १३० आॅक्सिजन सिलिंडरची आवश्यकता होती. हे प्रमाण गत चार महिन्यात तब्बल तीन पटीने वाढले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील बहुतांश गंभीर रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना आॅक्सिजनची आवश्यकता भासते. त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४५० जम्बो, तर १०० लहान सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. गत चार महिन्यात हे प्रमाण जवळपास तीन पटीने वाढले आहे. बहुतांश रुग्ण जास्त त्रास वाढल्यावर रुग्णालयात दाखल होत असल्याने त्यांना आॅक्सिजनची आवश्यकता जास्त भासते. अशा रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने आॅक्सिजनची गरज वाढली आहे.म्हणून जिल्ह्याचा भार जीएमसीवरजिल्ह्यात मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय वगळल्यास इतर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजनची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यासह शेजारील जिल्ह्यातील रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात जीएमसीत उपचार घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अकोला जीएमसीवर अतिरिक्त रुगणांचा भार वाढला आहे. त्यामुळे अनेकदा ऐनवेळी रुग्णांना आॅक्सिजन न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. तसेच अनेकदा सर्वोपचार रुग्णालयात आॅक्सिजन असूनही खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.
कोविड रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता गत काही दिवसात आॅक्सिजनची मागणी वाढली आहे. त्या दृष्टिकोनातून जीएमसीकडे पर्याप्त आॅक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. गरज पडल्यास आणखी सिलिंडरची व्यवस्था करु.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला