तेल्हारा तालुक्यातील सर्वाधिक शाळाबाह्य
शिक्षण विभागाने दहा दिवस राबविलेल्या विशेष शोध मोहिमेत सर्वाधिक शाळाबाह्य मुले तेल्हारा तालुक्यात आढळून आले. या तालुक्यात तब्बल १३८ शाळाबाह्य मुले आढळून आल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्याखालोखाल अकोला व अकोट तालुक्यातही ३२ मुले शाळाबाह्य आहेत. त्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यात २४ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आली.
ई-३चे प्रमाण अधिक
जिल्ह्यात ज्या मुली कधीही शाळेत दाखल झाल्या नाहीत(ई-१) अशी तब्बल ७९१ मुले आढळून आली आहेत. तर जी मुले शाळेत दाखल आहेत, त्यांची नावे नोंदविली आहेत. परंतु ते सतत गैरहजर आहेत.(ई-२) अशी २६६ मुले आढळून आली आहेत. त्यामुळे ई-२ प्रकारातील मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
मुले १३२ तर मुलींची संख्या १३४
शोध मोहिमेत आढळलेल्या २६६ शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी १३२ मुले आहेत. तर १३४ मुलींचा यात समावेश आहे. मुलींच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न यातून प्रकर्षाने पुढे आला आहे.