अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर प्रशासन भर देत आहे. त्या अनुषंगाने १५ मे पर्यंत आयोजित सहली रद्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी टूर आॅपरेटर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच शहरातील व जिल्ह्यातील लॉज-हॉटेलचालक व मालक यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच शहरातील ट्रॅव्हल एजंट, टूर आॅपरेटर्स व हॉटेल मालक चालकांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी उपस्थिताना कोरोनाविषयी माहिती दिली, तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवाशांच्या तब्येतीची माहिती कळवावी, तसेच इतर देशातून आलेल्या पर्यटकांची व प्रवाशांची माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांची यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. त्यांच्याकडून प्रवास करणाºया प्रवाशांची नोंद करावी. जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर आयोजित सहली रद्द कराव्या, सहलीसाठी जाणाºया लोकांची माहिती टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांनी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेसमध्ये आवश्यक स्वच्छता राखण्याच्या उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना देण्यात आल्या.
हॉटेल्स चालकांनाही सूचनाहॉटेल्सचालकांनीही त्यांच्याकडे उतरणाºया प्रत्येकाची नोंद घ्यावी. यामध्ये विदेशातून येणाºया प्रवाशांची विशेष दखल घ्यावी, तसेच त्याबद्दल प्रशासनाला कळवावे, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शिवाय, प्रवासी निवास करतात त्या खोल्यांची नियमित स्वच्छता राखण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.