अकोला : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत आहे असे संकेत मिळत असतानाच गत आठवडाभरापासून नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवार, ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २९५५ झाली असून, सद्यस्थितीत ४९६ जणांवर उपचार सुरु आहेत.जुलै महिन्याच्या उत्तरार्धात नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण किंचित घटले होते. आॅगस्ट महिना सुरु होताच रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १५० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११८ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये १८ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये रामनगर येथील पाच जणांसह बार्शीटाकळी येथील तीन जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, प्रसाद कॉलनी येथील तीन जण, दाळंबी येथील तीन जण, केशव नगर येथील दोन जण, केळकर हॉस्पिटल येथील दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय बोरगाव मंजू, रतनलाल प्लॉट, न्यू भिमनगर, चिंतामणी नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, गोपालखेड, मलकापूर, जीएमसी वसतीगृह, आनंद नगर, सस्ती ता. बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
४९६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४९६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल- १५०पॉझिटीव्ह- ३२निगेटीव्ह-११८
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २४५७+४६६=२९५५मयत-११४डिस्चार्ज- २३४५दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९६