हिवरा कोरडे गावातील धान्य दुकानदार, खासगी वाहनधारक, पानपट्टी, हॉटेल्स चालकांसह इतर व्यक्ती, गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. कार्यक्षेत्रात अजूनही कोरोनाचे रुग्ण असल्याचे प्राप्त झालेल्या अहवालानुसार माहिती मिळाली आहे. अशा रुग्णांना आवश्यक ती खबरदारी घेता यावी याबाबत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड बाबतीत तपासणी करून घेण्याबाबत गावातील आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, आरोग्य विस्तार अधिकारी (साथरोग) संजय घाटे कुरूम, तलाठी पी.एस. घाटोळ, आरोग्य सेविका ओ.डी. सावळकर, रूपाली चारथळ, आरोग्यसेवक जय काळे, वैजनाथ मिसाळ, गटप्रवर्तक अनिता गारपवार, आशा स्वयंसेविका मीना गेडाम, ग्रामपंचायत परिचर सुरेंद्र पानेकर यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
फोटो: