सुरुवातीला काहींनी प्रशासनाकडून लग्न समारंभासाठी परवानगी घेतली; परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी परवानगी न घेताच १००० ते १५०० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले. दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यात एकही गाव शिल्लक नाही, त्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डीजे, ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास तीन हजार लग्नसोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची नजर चुकवून लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. याच वेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला. या लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी आता कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे.
--बॉक्स--
२७३ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल
येथील सह. दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय यांच्याकडे वर्षभरात २७३ जोडप्यांनी लग्न झाल्याची नोंद केली आहे. हा आकडा कार्यालयापुरता असला तरी प्रत्यक्षात लग्नसोहळ्यांचा आकडा हजारांमध्ये असल्याचे जाणकार सांगत आहेत. विवाह नोंदणी करण्यास ग्रामीण भागात अद्याप उदासीनता दिसून येत आहे.
--बॉक्स--
एप्रिल कठीणच
वर्षभरात धूमधडाक्यात झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ एप्रिलपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली तरीही काही जण लग्न समारंभ करीतच आहेत.
--बॉक्स--
वर्षभरात ६१ लग्नतिथी
पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान ३२, तर नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान २९ लग्नतिथी आहेत; मात्र कोरोनाचा कहर सुरूच असल्याने व परवानगीची किचकट प्रक्रिया असल्याने अनेक जण लग्नसोहळे पुढे ढकलत असल्याचे दिसून येत आहे.
--कोट--
मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया
मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग असतानाही काही प्रमाणात व्यवसाय झाला; मात्र या उन्हाळ्यात व्यवसाय ठप्प आहे. एकही लग्न समारंभ मंगल कार्यालयात होत नाही. केवळ २५ लोकांची परवानगी असल्याने मंगल कार्यालयात लग्न समारंभ होत नाही.
- संदीप देशमुख, मंगल कार्यालय चालक
--कोट--
कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे? असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे मंगल कार्यालयासोबत या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे मोठे नुकसान होत आहे.
- भैयासाहेब उजवने, मंगल कार्यालय चालक