शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

कोरोनामुक्त रुग्णाला झाली नाही पुन्हा बाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:16 AM

गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अ‍ॅन्टीबॉडिज मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे अशा रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी असते. गत पाच महिन्यात असा एकही रुग्ण पुन्हा कोरोनाची लागण झाली म्हणून रुग्णालयात दाखल झालेला नाही.कोरोनावर प्रभावी औषध नाही; मात्र उपचाराच्या दहा दिवसांमध्ये वैद्यकीय निगराणीत असताना रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातात. त्यासाठी रुग्णाच्या जेवणात प्रामुख्याने कडधान्य असलेली भाजी, वरण-भात, पोळी, शेंगदाण्याचा लाडू, अंडे, ड्रायफ्रुट्स, फळं आदींचा समावेश केला जातो. या काळात रुग्णाच्या शरीरात कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडिज मोठ्या प्रमाणात वाढतात. या अ‍ॅन्टीबॉडिज रुग्णाच्या शरीरात जास्त काळ टिकून राहत असल्याने रुग्णाना पुन्हा कोरोना होण्याचा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या रुग्णाला कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचा एकही प्रकार जिल्ह्यात घडला नाही, हे विशेष.दहा दिवसांच्या उपचारामध्ये कोविड रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे दहा दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांमध्ये अ‍ॅन्टीबॉडिजही तयार होतात. त्यामुळे रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याचा धोका कमी असतो. गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळले नाही.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला