वाडेगाव:
बाळापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या
वाडेगाव येथे २ मार्च रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्राम पंचायत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. येथील अठरा वर्षीय युवक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वाडेगाव येथे प्रशासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गावाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ग्राम प्रशासनाकडून कुठले पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाडेगाव येथे मोठी बाजारपेठ असून बसस्थानक परिसरा चौका-चौकात नागरिक मास्क न वापरता तसेच नियम न पाळता गर्दी करीत आहेत..