आरोग्य विभागाची चिंता वाढली
मागील तीन महिन्यांत एकाही गर्भवतीला कोरोनाची लागण झाली नव्हती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला होता, मात्र मागील आठ दिवसांपासून दररोज सरासरी एक गर्भवती कोविड पॉझिटिव्ह येत आहे. गर्भवतींमध्ये काेविडचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय असून आरोग्य विभागाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
प्रत्येक गर्भवतीची होतेय कोविड चाचणी
जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोला शहरासह ग्रामीण भागातील तसेच शेजारील जिल्ह्यातील गर्भवती मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे खबरदारी म्हणून येथे येणाऱ्या प्रत्येक गर्भवतीची कोविड चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णलायातर्फे देण्यात आली.
मागील आठ दिवसांपासून दररोज सरासरी एक गर्भवती कोविड पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे चिंता वाढली असून जिल्हा स्त्री रुग्णालयात आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. पाॅझिटिव्ह गर्भवतींना सर्वोपचार रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला