शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू; ६७ नवे पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:58 PM

२६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२४ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून , शनिवार २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२४ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७०८१ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोड येथील सहा, अकोट येथील पाच, अमनखा प्लॉट व बाळापूर येथील प्रत्येकी चार, जीएमसी, खडकी, राऊतवाडी, व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन , पातूर, बोर्डी, सिव्हिल लाईन, वानखेडे नगर, रणपिसे नगर, जवाहर नगर, सिंधी नगर, कौलखेड, वडद, बोरगाव मंजू व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण, खामखेड ता. पातूर, मारोती नगर, स्टेशन रोड, रतनलाल प्लॉट, रामदास पेठ, सुधीर कॉलनी, द्वारका नगरी, कोलंबी, चागेफल, गिरिनगर, आसरा कॉलनी, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट व निमवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.तिघांचा उपचारादरम्यान मृत्यूशनिवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जुने शहर, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष, अकोट फाईल येथील ८४ वर्षीय पुरुष आणि महसूल कॉलनी, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.१,५२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,०८१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला