अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील मुर्तीजापूर, तेल्हारा तालुक्यातील सिरसोली व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला. यामुळे मृतकांची एकूण संख्या १६३ झाली आहे. आणखी ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ४३३७ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी ३७४अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत २८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये ३३ महिला व ५४ पुरुष आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकट्या मुर्तिजापूर येथील २४ जणांसह, निंबा ता. मुर्तिजापूर येथील ११ जण, मोरवा ता. बाळापूर येथील सात जण, जीएमसी येथील सहा जण, कौलखेड, विद्यानगर गौरक्षणरोड, वाडेगाव येथील प्रत्येकी तीन जण, खडकी, गीता नगर, जठारपेठ, डाबकी रोड, दहिगाव गावंडे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, लोणी, चोहट्टा बाजार, तुकाराम चौक, गायत्री नगर, गंगा नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, मलकापूर, मराठा नगर, कापसी, तापडीया नगर, निंबवाडी, सकनी महान, पातूर नंदापूर, प्रोफेसर कॉलनी, शिवसेना वसाहत, बळवंत कॉलनी व रवि नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.दोन महिला, एक पुरुषाचा मृत्यूशुक्रवारी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये मलकापूर येथील ५५ वर्षीय महिला, सिरसोली ता. तेल्हारा येथील ६५ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही अनुक्रमे २ सप्टेंबर, १९ आॅगस्ट व २९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.७३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,३३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,३४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोल्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू; ८७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 1:38 PM