महिन्यानुसार मृत्युदर
महिना - मृत्युदर (टक्क्यांमध्ये)
एप्रिल - ७.१४
मे - ५.५२
जून - ५.०३
जुलै - ३.९८
ऑगस्ट - ३.७६
सप्टेंबर - ३.१४
ऑक्टोबर - २.१६
नोव्हेंबर - ३.१०
डिसेंबर - ३.०६
आजार अंगावर काढणे ठरू शकते घातक
अनेकजण कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आजार अंगावर काढतात. जास्त त्रास झाल्यानंतर कोरोना चाचणी आणि त्यात पॉझिटिव्ह आल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. दरम्यानच्या काळात कोरोनाचा फुफ्फुसांवर घातक परिणाम होत असून, त्यात रुग्णाच्या मृत्यूची शक्यता वाढते.
नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कुठलाही आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. वेळेतच कोविडची चाचणी करावी. पॉझिटिव्ह येताच रुग्णालयात दाखल व्हावे. रुग्णसंख्या वाढ आणि मृत्युदर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला