अकोला : प्राथमिक स्तरावरच कोरोनाच्या रुग्णांचा शोध व्हावा, यासाठी आरोग्य विभागाने नव्याने अॅक्शन प्लान तयार केला आहे. त्यानुसार, आता प्रत्येक रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या निगराणीत राहणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे.गत पाच महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला. या कालावधीत कोरोनाविषयी जनजागृती झाली असली, तरी बहुतांश लोक सर्दी, ताप अंगावर काढतात. बहुतांश लोक फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतात. या काळात एकापासून इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाने अॅक्शन प्लान आखला आहे. यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे.असे होणार रुग्णांचे ट्रेसिंग
- तालुकास्तरावर खासगी डॉक्टरांचा गृप तयार केला जाईल.
- या सर्व डॉक्टरांवर तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे नियंत्रण राहील.
- मनपा क्षेत्रातील डॉक्टर मनपा वैद्यकीय अधिकाºयाच्या नियंत्रणात राहतील.
- खासगी रुग्णालयात येणाºया प्रत्येक रुग्णाची नोंद केली जाईल.
- कोरोनाची लक्षणे दिसताच संबंधित रुग्णाची माहिती खासगी डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्यांना देईल.
- त्यानंतर आरोग्य यंत्रणा थेट संबंधित रुग्णाशी संपर्क साधेल.
अनेक मेडिकलवर नोंद नाहीबहुतांश रुग्ण डॉक्टरकडे न जाता थेट मेडिकलमधून औषध खरेदी करतात; मात्र त्यांची नोंद होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध घेणे शक्य नाही. या रुग्णांकडून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. आता नव्याने रुग्ण शोधण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाईल. खासगी डॉक्टरला प्रत्येक रुग्णाची नोंद करून, त्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाºयाला देणे अनिवार्य राहील. ही माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा संबंधित रुग्णाची वैद्यकीय तपासणी करेल.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला