अकोला : जिल्हा परिषद अर्थ विभागातील एक कर्मचारी आणि अकोला पंचायत समितीमधील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अर्थ विभागातील वर्ग ३ मधील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाली. कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तसेच अकोला पंचायत समितीमधील लेखा शाखेतील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.