अकोला- शासकिय वैद्दकीय महाविद्दालय अर्थात कोविड रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण होत असल्यामुळे परिस्थीती अतिशय गंभीर होत चालली आहे.त्यामुळे अकोला महानगरातील एखादे मोठे खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तिथे कोरोना रूग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज केली.त्यांनी या मागणीचे एक लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.दरम्यान कोरोनाचे नमुने तपासणीसाठी आणखी एक लॅब सुरू करण्याचे त्यांनी या निवेदना द्वारे सुचविले आहे. अकोला शहरासह ग्रामिण भागातही कोरोना आजाराने शिरकाव केला आहे.अकोल्यात तर हि परिस्थीती हाताबाहेर जाते की काय अशी स्थीती निर्माण झाली आहे.हि परिस्थीती पाच ते सात दिवसांपासुन निर्माण झाली आहे.शासकीय कोवीड रूग्णालयाची क्षमता ८० टक्केच्या वर गेल्यानतंर तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहित करून तेथे कोरोना रूग्णांची उपचारासाठी व्यवस्था करावी अशा शासनाच्या सुचना असुनही अकोल्यात आतापर्यंत हा निर्णय का घेण्यात आला नाही.या बाबतही डॉ.रणजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तेथे संपुर्ण व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.असे रूग्णालय अधिग्रहीत करतांना तेथील सर्वच कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचा विमा शासनाने काढुन त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.अधिग्रहीत केलेल्या खाजगी रूग्णालयात भरती असलेल्या सर्व रूग्णांचा खर्च शासनाने करून तेथे सर्व सुविधा देण्यात याव्या असेही त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.
लॅबसाठी ५० लाख रूपये निधी देण्याची तयारी
अकोल्यात सुरू करण्यात आलेल्या लॅब मध्ये दिवसाला केवळ ९० नमुनेच तपासणी केली जातात.या लॅबवर तिन जिल्ह्याचा भार असुन जवळपास २०० च्यावर नमुने तपासणीसाठी बाकी आहेत.त्यामुळे आणखी एक लॅब असणे अत्यंत गरजेचे आहे.अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्दापीठात ही लॅब सुरू करता येते.मात्र हि लॅब सुरू करण्यासाठी ५० लाख रूपये खर्च आहे.यासाठी मी ५० लाख रूपये निधी देण्यास तयार आहे.मात्र हि लॅब सुरू करून कोरोना नमुने तपासणी संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी डॉ.रणजीत पाटील यांनी केली आहे.
खाजगी डॉक्टरांनाही विमा कवच देण्याची गरज
शासनाच्या आवाहनावरून अनेकांनी त्यांचे खाजगी रूग्णालयात सेवा देणे सुरू केले आहे.मात्र येणारा रूग्ण हा कोरोना बाधित आहे किंवा नाही याची माहिती त्या रूग्णाला व संबधित डॉकटरलाही नसते.त्यामुळे शहरातील दोन ते तिन डॉक्टरही कोरोना बाधित झाले आहेत.त्यामुळे खाजगी डॉक्टरांना शासनाने विमा कवच देणे गरजेचे आहे. शिवाय खाजगी रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णांचे नमुने तपासणी करून तसा अहवाल तातडीने दीला तर त्या रूग्णावर उपचार करचे सोपे होईल असे मतही डॉ रणजीत पाटील त्यांनी व्यक्त केले आहे.