अकोला : येथे आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या होळीच्या सणावर कोरोनाचे सावट आल्याने होळीचे रंग फिके होणार आहेत. गणेशोत्सवानंतर ग्रामीण भागात सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा होळीचा सण काही दिवसांवर आला असला, तरी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, यंदाही होळीचा सणावर मर्यादा येणार आहेत. या वर्षीही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रंगपंचमीसाठी उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या बच्चेकंपनीमध्येही निर्बंधामुळे हिरमोड होणार आहे.
------------------------------------------------------
कूलर उद्योग पुन्हा संकटात!
अकोला : गतवर्षी उन्हाळ्याला सुरुवात होताच, कोरोनाच्या विषाणूने कहर केल्यामुळे केंद्र शासनाने देशभरात टाळेबंदी लावली होती. यामुळे उद्योग जगताला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचा कूलर उद्योगालाही मोठा फटका बसला होता. या वर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होत असतानाच, कोरोनामुळे उद्योगांमध्ये पुन्हा मंदी येत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
------------------------------------------------------
बस स्थानकात सॅनिटायझर मशीन आवश्यक
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. शहरातील मध्यवर्तीय बस स्थानकावर परराज्यासह इतर जिल्ह्यातून प्रवासी येतात. येथे तपासणीसाठी कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे. बस स्थानकात प्रवाशांनी सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक असून, सॅनिटायझर मशीन बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.